वैनगंगा नदीतून त्रीकुटाद्वारे रेतीचे अवैध उत्खनन

वैनगंगा नदीतून त्रीकुटाद्वारे रेतीचे अवैध उत्खनन

सावली/ प्रतिनिधी

तालुक्यात येणाऱ्या पाथरी, अंतरगाव, निफद्रा येथिल काही रेती तस्करांनी वैनगंगा नदी पात्रातील सुमारे २५० ते ३०० ब्राॅस रेती उत्खनन करून गोसीखुर्द कालव्याच्या बाजुला साठवणूक करून ठेवण्यात आली आहे. मात्र याकडे शासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

 

शासनाने कोणत्याही रेती घाटाचे अद्याप लिलाव केलेला नाही मात्र या परीसरातील काही मोजक्या  रेती तस्करांनी अधिकार्यासोबत साठघाट करून आपल्याकडे रेती परवाना असल्याचे आव आणत रेती तस्करी जोमात सुरू आहे. या तस्करीमध्ये करोडो रुपयांच्या रेती साठा विकण्यात आला काही मोजक्या येथेच तस्करांनी केली ही तस्करी प्रशासनाच्या नजरेत असूनही त्यावर कारवाई का बरे करण्यात आली नाही याची चर्चा या परिसरात होत आहे.

काही दिवसांपुर्वी सावली च्या तहसीलदारांनी ३० ते ४० ब्राॅस रेती साठ्यावर  कारवाई करण्यात आलेल्या रेतीचा लिलाव करून याच अवैध रेती तस्करांना विकण्यात आली होती. मात्र या तस्करांनी त्याच लिलावाच्या रेतीचा आधार घेत हजारो ब्राॅस चोरीची रेती शिरजोरपणे विक्री केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. या रेती तस्करांनी पाथरी परीसरातील अनेक गावांना रेतीचा हजारो रुपये घेऊन पुरवठा केला आहे. वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे हे ढिगारे पालेबारसा, हिरापूर, पाथरी, मेहा, निमगाव, मिरखल, दाबगांव या गावांमध्ये रेती  तस्करांकडून लपून ठेवले जातात व तिथेच खूले आम विकले जातात. यापूर्वी 2018 ते 2019 ला देवाळकर कन्स्ट्रक्शन कंपनी ला लाखो रुपयाच्या रेती साठ्याचे उत्खनन करण्यात आले होते, त्यावेळी

गोसीखुर्द प्रकल्पाचे कालव्याचे काम सूरू होते पण कोणत्याच अधिकाऱ्यांनी या संबंधात चौकशी केली नाही, रेती तस्करांना अभय देण्यात आले.  अंतरगाव ते मेहा या याठिकाणी रेती साठा करण्यात आला होता. या चोरीच्या प्रकरणाची विधानसभेमध्ये चर्चा सुद्धा घडवण्यात आली सोबतच रेती तस्करांवर गुन्हे ही दाखल करण्यात आले होते पण त्यानंतर तेच रेती तस्कर याठिकाणी पून्हा सक्रीय झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *